Ad will apear here
Next
उलगडली ‘चिंटू’ची गोष्ट...
रत्नागिरीतील ‘पुलोत्सवात’ रत्नागिरीकरांनी अनुभवली व्यंगचित्रांची दुनिया


रत्नागिरी :
गेली २७ वर्षे आबालवृद्धांना हसवणारा चिंटू नेमका कसा साकारला जातो, याची गोष्ट खुद्द ‘चिंटू’कार चारुहास पंडित यांच्याकडूनच जाणून घेण्याची संधी आठ डिसेंबर २०१८ रोजी रत्नागिरीकरांना मिळाली. तसेच त्यांना व्यंगचित्रांच्या दुनियेत फेरफटकाही मारता आला. रत्नागिरीत सुरू असलेल्या ‘पुलोत्सवा’त चित्रकार चारुहास पंडित यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान मुलांसह विविध वयोगटांतील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

‘आशय सांस्कृतिक, पुणे’ आणि ‘आर्ट सर्कल’ या संस्थांनी आयोजित केलेला पुलोत्सव सध्या रत्नागिरीत सुरू आहे. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंडित यांनी चिंटूचे चित्र काढून दाखवले, तसेच त्याच्या निर्मितीतील अनेक किस्सेही सांगितले. ते म्हणाले, ‘१९९१पासून आजतागायत चिंटू सुरू आहे. अनेक वर्षे ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होणाऱ्या चिंटूला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अनेकदा चिंटू शब्दविरहितही  केला. चिंटू तुमच्या-आमच्यासारखाच आहे. कधी स्मार्ट, कधी बावळट, वात्रट, विनोदी, पण काही तरी संदेश देणारा आहे. चिंटूच्या मनातील अनेक भावना व वास्तवातील चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चिंटू घरातलाच वाटतो. पुलं गेल्याची बातमी आली तेव्हा मी व प्रभाकर वाडेकर अस्वस्थच होतो. प्रसंग गंभीर होता. नंतर, आतमध्ये पुलंची पुस्तके ठेवली आहेत आणि चिंटू बाहेर येऊन पाहतोय, असा निःशब्द आविष्कार साधला. ते पाहून अनेकांनी डोळ्यांत पाणी आल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.’



ते म्हणाले, ‘पूर्वी दिवाळी अंकामध्ये येणारी व्यंगचित्रे पाहून मी शिकलो. शि. द. फडणीस, बाळासाहेब ठाकरे, मंगेश तेंडुलकर, मारिओ मिरांडा यांनी काढलेली व्यंगचित्रे पाहिली. चिंटू हे काल्पनिक पात्र असले, तरी माझ्या लहानपणी किंवा आसपास दिसणाऱ्या अनेक कथा त्यातून मांडल्या. आता फेसबुकवर चिंटूला सहा लाख फॉलोअर्स आहेत. अॅनिमेटेड स्वरूपातही तो आला आहे. आणखीही काही माध्यमांतून चिंटू दिसेल.’

‘व्यंगचित्रामध्ये कमीत कमी रेषांत बरेच काही सांगायचे असते. व्यंगचित्रकाराकडे भरपूर निरीक्षणशक्ती हवी, शोधक वृत्ती हवी. देहबोली, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, संपादन अशा अनेक विषयांचे ज्ञान त्याला असावे लागते. विद्यार्थ्यांनी किंवा मोठ्यांनीही आपले म्हणून स्वतःचे एक कॅरेक्टर (पात्र) तयार करावे. ते सोप्या पद्धतीने काढता येऊ शकते. एकेका रेषेने चेहऱ्यावरील भावभावना बदलत जातात,’ असेही पंडित यांनी सांगितले.

(कार्यशाळेत चारुहास पंडित यांनी साकारलेले चिंटूचे चित्र आणि त्यांनी सांगितलेले काही किस्से पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZVFBV
Similar Posts
‘पुलं’च्या व्यक्तिरेखा भेटणार ‘पुलकित रेषां’मधून... रत्नागिरी : आर्ट सर्कल आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे रत्नागिरीत होणार असलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये ‘पुलकित रेषा’ हे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा विविध चित्रकारांच्या कुंचल्याच्या माध्यमातून त्या वेळी रसिकांना अनुभवता येणार आहेत. ‘चिंटू’ या लोकप्रिय
प्रियांका बर्वे पुलोत्सव तरुणाई पुरस्काराची मानकरी रत्नागिरी : पु. ल. देशपांडे यांच्या सासुरवाडीत म्हणजेच रत्नागिरीत ‘आर्ट सर्कल’तर्फे होणारा पुलोत्सव यंदा ‘पुलं’च्या जन्मशताब्दीमुळे अधिक उत्साहाने होणार आहे. सात ते नऊ डिसेंबर २०१८ या कालावधीत हा उत्सव रंगणार आहे. यंदाचा पुलोत्सव सन्मान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना, तर पुलोत्सव तरुणाई पुरस्कार
‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा रत्नागिरी : पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला माहिती आहेत. लेखनासह विविध कलांच्या त्यांनी केलेल्या आविष्काराचा आनंद आपण कोणत्या ना कोणत्या रूपात लुटत असतो. त्या पलीकडेही दातृत्व हा त्यांच्या जीवनाचा एक मोठा पैलू होता. समाजात तो पैलू वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने
‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी रत्नागिरी : ‘पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनात समाजजीवनाचे मर्म टिपले आणि नुसते सांगण्यापेक्षा काही तरी करून सांगावे अशी त्यांची शब्दकळा होती. ‘परफॉर्मन्स स्किल’ हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. तो मला भावला. त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेमुळेच ज्यांना त्यांच्या आवाजाची सवय आहे, त्यांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language